Saturday, December 7

मीडियम स्पाइसी मध्ये झळकणार राधिका आपटे, व्हिडिओ झाला लिक!

सध्या सगळीकडेच मराठी चित्रपट ‘मीडियम स्पाइसी’ची जोरदार चर्चा आहे. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेला ‘मीडियम स्पाइसी’ पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो म्हणजे चित्रपटातील लीक झालेल्या एका सीनमुळे! आणि विशेष म्हणजे या सीनमध्ये चक्क आपल्या सर्वांची लाडकी राधिका आपटे दिसतीये. ललित आणि राधिका एका हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत आहेत, असा हा सीन असून, राधिका नक्की कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार याची चर्चा होत आहे. राधिका तब्बल आठ वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर व राधिका यांनी यापूर्वी मराठी प्रायोगिक नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. राधिका पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार असल्याने तिचे चाहते या चित्रपटाची वाट बघत आहेत ।

प्रसिद्ध निर्मात्या विधि कासलीवाल यांची निर्मिती असलेल्या “मीडियम स्पाइसी” या चित्रपटाच्या माध्यमातून सुविख्यात नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा “मीडियम स्पाइसी” येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे ।

मीडियम स्पाइसी मध्ये झळकणार राधिका आपटे, व्हिडिओ झाला लिक!